Profile
Name
Niva Sowani
Description
Welcome to life of Niva where joy, happiness and innocence is in abundance.
Subscribers
16.6K
Subscriptions
Friends
Channel Comments
![]() |
TejasGaikwad-t9v
(4 minutes ago)
मुलांकडून कोणतीही अपेक्षा न ठेवली तर उरलेले आयुष्य खूप सुंदर जगता येईल कालयुग आहे हे मनात बिंबवा
|
![]() |
surekhaadsul1230
(9 minutes ago)
ताई परदेश सोडा
|
![]() |
rameshwarjawanjal2844
(17 minutes ago)
“अपेक्षा” हा शब्द जीवनातून काढला तर जीवन सुंदर व आनंदी होईल.
|
![]() |
shreesaraf1752
(27 minutes ago)
खूप आई वडिलांना आपले मूल विदेशात आहेत याचा इतका अहंकार असतो की ज्याची मूले भारतात आहे ते फार ढ आहेत असे त्यांनी वाटते
|
![]() |
More-h4n
(31 minutes ago)
मी परदेशात राहतो. माझा मोठा भाऊ इनिडा येथे राहतो. माझे आईवडील मूळ ठिकाणी एकटे राहत होते. माझ्या आईच्या मृत्यूनंतर, माझे वडील 85 वर्षांचे होते आणि ते एकटे राहू शकत नव्हते. माझ्या भावाने त्याची काळजी घेण्यास नकार दिला. माझ्या वडिलांची काळजी घेण्यासाठी मला माझ्या पत्नीला भारतात लहान मुलांसोबत ठेवण्यास भाग पाडले गेले. मी त्यांची 91 व्या वर्षी मरेपर्यंत काळजी घेतली. त्यामुळे तुम्ही भारतात किंवा परदेशात राहता यावर अवलंबून नाही. हे तुमच्या मूल्य प्रणालीवर अवलंबून आहे.
|
![]() |
anjalibhide7300
(47 minutes ago)
आजी तुम्ही सांगितलेली परीस्थिती आता सगळीकडेच दिसते. परदेशात मुलं असतील तर त्यानाही भारतात येणं कठीण होतं. अशावेळी आईवडीलांना त्यांनी तिकडे न्यावं. पण काहीवेळा पालकही तयार नसतात जायला. अशावेळी मुलांनी आपली जबाबदारी म्हणून आजारपणात तरी येवून त्यांची सेवा करावी. काहीवेळा भारतात असणारी मुलेसुद्धा पालकांना विचारत नाहीत. प्रत्येकाने आपल्याला एकटंच रहायचं आहे अगदी जोडीदाराशिवाय अशा मानसिक तयारीत असावं. हेच खरं.
|
![]() |
5D_is_Reality
(52 minutes ago)
ह्या सासवांना विदेशातील सुनांचा फार पुळका असतो. घरात जी सून असते , जी दोन टाईम जेवू घालते आजारी पडल्यावर मदत करते, तिला ते तुच्छ लेखतात.
|
![]() |
Nik_Heal25
(1 hour ago)
आजी , माझं सुद्धा mechanical engineering झालंय आणि माझे वडील मला सारखं म्हणायचे तू जा जर्मनी तुला काय पाहिजे ते खर्च करतो आणि मला माहिती आहे वडील जीवावर दगड ठेऊ शकतात पण आई नाही. मी Mummy कडे पाहिलो आणि नाही म्हणालो आज तुमचे शब्द ऐकून मला माझ्या घेतलेल्या निर्णयावर अभिमान वाटतोय
|
![]() |
ajitdeshpande18
(1 hour ago)
मुलांवर विश्वास ठेऊ नका. आपली शारीरिक परिस्थिती पाहून चांगल्या वृद्धाश्रमाची वाट धरा
|
![]() |
aditikarkhedkar3675
(2 hours ago)
कोण कसं जाईल, केव्हा जाईल , कोण शेवटी जवळ असेल हे सांगता येत नाही. मी योगायोगाने अंतिम क्षणी मुलं घरी आलेली ही बघितली आहेत.
|
![]() |
Nsm81
(12 hours ago)
भारतात देखील थोड्या फार फरकाने अशीच परिस्थिती आहे.
|
![]() |
Jasmine_14357
(2 hours ago)
ताई तुम्ही म्हणालात ते अगदी खरं आहे. माझी मुलं अमेरिकेत आहेत हा इकडच्या आई-वडिलांना खूप अभिमान वाटतो आणि जेव्हा ते दुसऱ्यांना नाव ठेवतात. किंवा फक्त आपल्याच मुलाचं कौतुक करतात तेव्हा त्यांना हे माहिती नसतं की आपली मुलं आपल्याला किती सांभाळतील किती लक्ष देतील आपल्याकडे. पण जेव्हा असे अनुभव येतात तेव्हा खरं तर ते मनातून खचलेले असतात असतात पण लोकांसमोर असं दाखवत नाहीत.. नुसता पैसा असून उपयोग नाही वेळेला माणूसच उपयोगी पडतो.
|
![]() |
amolchiplunkar7292
(5 hours ago)
फारच हृदयस्पर्शी संदेश आहे. आयुष्याचं गणित समजण्यात उशीर झाला की गेलेला काळ आणि प्रियाजनांच वय व आयुष्य परत आणता येत नाही. आपण फारच प्रभावीपणें हा मुद्दा मंडलात.
|
![]() |
kalpanakshatriya4244
(16 hours ago)
भरपूर ऐकले आहे मेल्यावर फक्त मुलगा येतो बायको व मुलांना आणत नाही .सर्व क्रियाकर्म करून निघून जातात मागे कोणीतरी दोघांपैकी एक असतो .तेव्हा आईला जास्त करून खूप आनंद वाटतो परदेशात गेला म्हणून.सुनेला फक्त आपल्या माहेरची लागतात.सर्वच मूल अशी गृहीत धरून चालत नाही.चांगली मूल पण आहेत मुळात गावाकडची.माझा मुलगा परदेशात आहे पण तो आता कायमचा भारतात येणार आनंद वाटतो.मी तर जाऊ नको म्हणायची...पण ते आपल्या करिअर साठी जातात.तिथं त्यांना खूप किंमत देतात हुशारीचे कौतुक करतात.🏻🏻
|
![]() |
shalinip7357
(1 hours ago)
आता परिस्थिती अशी आहे एकमेकांवर फार अवलंबून आणि अपेक्षा न ठेवणे बरे.मुल भारतात राहीली काय परदेशात राहिली काय जर प्रेम आत्ममियता असेल तर कर्तव्यदक्ष असतातच.
|
![]() |
shubhangipansare5347
(18 hours ago)
मावशी फार ऐकुन वाईट वाटले. तुम्ही बरोबर सांगत आहात परंतु असे एखादे लाखात एक वाईट उदाहरण! सगळी मुलं अशी नसतात. पॅाझिटिव्ह उदाहरणं देखील खुप आहेत.
|
![]() |
manjushreephadke2863
(21 hours ago)
खूप छान सांगितलं आहे, मावशी तुम्ही,,, सर्वांची चांगली कान उघडणी केली आहे. त्याबद्दल खूप धन्यवाद,,, आम्हाला तुमचे असे अजून विचार ऐकाव्ययास आवडतील धन्यवाद.
|
Add comment